Pimple Gurav: ‘शौर्यगाथा हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याची’ देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – मराठवाडा मुक्तीसंग्राम (Pimple Gurav) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने ‘शौर्यगाथा हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याची’ या देशभक्तीपर कार्यक्रमाचे पिंपळे गुरव येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री संत गजानन महाराज मंदीर संस्थान सांगवीचे अध्यक्ष ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 251 पुस्तके अर्पण करून करण्यात आले. यावेळी उद्योजक विवेक भोसले, ह.भ.प. बाबुराव तांदळे महाराज, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, सद्गुरु सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन म्हसे, दिलीपराव बारडकर, उद्योजिका प्रितीताई काळे, समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, मराठवाडा जनविकास संघ प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ शेटे, राजपुत समाज संघटनेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस, रवि पाटील, सतीश काळे, किशोर पाटील, सुर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, बळीराम कातंगळे, किसन फसके, अनुराग दुधभाते, किशोर आटरगेकर, सोशल मिडीया प्रमुख प्रा. डॉ. प्रविण घटे, अमोल लोंढे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालिंदी नेस्ताने, कलावंत इंद्रभान करे, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ व भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.

अमृत महोत्सव वर्षानिमित्त ’75 रिक्षा मराठवाडा मुक्तीसंग्राम फिरते वाचनालय’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या रिक्षासाठी जनार्धन सोनवणे यांनी 75 पुस्तकांचा संच भेट (Pimple Gurav) देऊन शुभारंभ करण्यात आला. पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई येथे राहणाऱ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जाज्ज्वल्य इतिहास कळावा. आपल्या धकाधकीच्या जीवनात रिक्षातून प्रवास करताना पुस्तक वाचता यावे, ही या मागची भूमिका आहे.

क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचा मुलगा अभियंते विवेक भोसले यांनी अपरिचित हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास, त्यांचे कार्य याची माहिती दिली. क्रांतीवीर दत्तोबा भोसले, कन्नडचा वाघ देशमुख, क्रांतीवीर माणिकचंद पहाडे, जामगावचे विठ्ठलराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, बारा बलुतेदार स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती दिली.

सचिन म्हसे यांनी सांगितले, की येत्या वर्षभरात संपुर्ण मराठवाड्यात 750 मराठवाडा मुक्तीसंग्राम वाचनालय चालू करण्याचा संकल्प व्यक्त केला. तुळजापूर तालुक्यात 75 वाचनालय चालू करण्याचे पहिले पाऊल म्हणून बारुळ येथील शिवानंद सार्वजनिक वाचनालयास 251 पुस्तके भेट देण्यात आली.

अरुण पवार यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या 11 मागण्या केल्या आहेत. त्यांचा पाठपुरावा करुन मंजुर करुन घेऊ. मराठवाड्यातील अपरिचित स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास पुस्तकरुपात आणण्यासाठी सढळ हाताने मदत करण्यात येईल आणि मराठवाड्यात वर्षभरात 75 हजार वृक्ष लागवड, संवर्धन आणि 75 हजार पुस्तकांचे वाटप हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे.

Akurdi : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त पूर्वांचलातील समाजसेवकांना पुरस्कार प्रदान

ह.भ.प. बाबुराव तांदळे महाराज यांनी सांगितले, की अरुण पवार व नितीन चिलवंत हे मराठवाड्याच्या विकासासाठी करीत असलेले कार्य उत्कृष्ट आहे. त्यांच्या पाठीमागे उभे राहणे, हे मराठवाडा भूमिपुत्रांचे कर्तव्य आहे. बाळासाहेब काकडे यांनी सांगितले, की मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यासाठी आर्थिक पाठबळ सढळ हाताने देणार आणि उद्योजकातून उभे करणार आहे. शिवकुमार सिंह बायस यांनी मराठवाडा व विदर्भातील भूमिपूत्र एकत्र येत पिंपरी-चिंचवड महानगरात सामाजीक बांधीलकीने सेवा देऊन विदर्भ मराठवाडा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उभा करण्याचा संकल्प बोलून दाखवला. अभिनेता पृथ्वीराज थोरात आणि अभिनेत्री कालिंदी नेस्ताने यांनी वर्षभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम शौर्यगाथा चित्रपट निर्माण करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चिलवंत यांनी, तर आभार सुर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.