Pimple Saudagar : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये ख्रिसमस पार्टी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टी उत्साहात साजरी करण्यात आली.  

_MPC_DIR_MPU_II

यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिषमंजुळा मुदलियार,चर्च ऑफ लिविंग गॉड मधील पास्टर ऐजरा आणि त्यांची टीम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नाताळ सणाबद्दल माहिती सांगितली. येशूच्या गीतांवर चर्च ऑफ लिविंग गॉड मधील पास्टर ऐजरा आणि त्यांच्या टीम सोबत विद्यार्थ्यांनी गीत गायन,नृत्य सादर केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजिता महातो यांनी केले आणि शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी विद्यार्थ्यांना येशू ख्रिस्त यांच्या जन्माविषयी माहिती तसेच नाताळाचे महत्व समजावून सांगितले. शेवटी सांताक्लॉजच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी या पार्टीचा आनंद घेतला. पाहुण्याचे आभार हर्षदा काकडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.