Pune : नाताळनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने शनिवारी प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली व बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धा

एमपीसी न्यूज – नाताळनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि.21) प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली व बेस्ट सॅन्टाक्लॉज स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुणे धर्मप्रांत बिशप थॉमस डाबरे यांच्या हस्ते रॅलीस प्रारंभ होणार असून रॅलीची सुरुवात सायंकाळी पाच वाजता सेंट पॅट्रिक्स चर्च, बिशप हाऊस, एम्प्रेस गार्डनजवळ पुणे येथून होणार आहे. 

_MPC_DIR_MPU_II

या रॅलीचा मार्ग एम्प्रेस गार्डन जवळील सेंट पॅट्रिक्स चर्च येथील बिशप हाऊस पासून, सोलापूर रोड, फातिमानगर, विठ्ठलराव शिवरकर रोड, जांभूळकर चौक, जगताप चौक, संविधान चौक, रहेजा गार्डन, गंगा सॅटेलाईट, नेताजी नगर, लुल्लानगर चौक, सीटीसी, गोळीबार मैदान चौक, ट्राय लक हॉटेल चौक, कोहिनूर चौक, महात्मा गांधी रोडमार्गे महावीर चौक, अरोरा टॉवर्स चौक, बुटी स्ट्रीट, गवळी वाडा, मॅजेस्टिक हॉटेल, ख्राईस्ट चर्च मार्गे क्वार्टर गेट चौकातील सिटी चर्चमध्ये रॅली समाप्त होईल.

रॅली समाप्तीनंतर क्वार्टर गेट चौकातील सिटी चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची रॅली व बेस्ट सांताक्लॉज स्पर्धेचा पारितोषिक वितरण होईल. या रॅलीचे संयोजन शालोम ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष ख्रिस्तोपर राजमनी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.