Pimple Saudagar : प्रीपेड टास्कच्या बहाण्याने तरुणाला 39 लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज-  प्रीपेड टास्क करून जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या (Pimple Saudagar) अमिषातून तरुणाला 39 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे हा प्रकार 27 एप्रिल ते 17 मे या कालावधीत पिंपळे सौदागर येथे ऑनलाइन पद्धतीने घडला.

 

India : सिद्धू मुसेवालाच्या खुनाची जबाबदारी घेत गोल्डी ब्रारची सलमान खानला धमकी

 

याप्रकरणी साई संतोष व्यंकटरमना वुन्ना (वय 30 राहणार पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी(दि.26) फिर्याद दिली असून अनोळखी महिला मीना व टेलिग्राम आयडी वरील रमा या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांना व्हाट्सअप नंबर वर संपर्क साधत  रमा हिने @Rama 1709, arm worldwide Mission Group टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड करत वेगवेगळे प्रीपेड टास्क देत बँक खात्यावरील रक्कम घेत मुद्दल व कोणताही परतावा न देता तब्बल 39 लाख 15 हजार 415 रुपयांची फसवणूक केली आहे.

\

सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत (Pimple Saudagar)  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.