Pimple Saudagar : ऑनलाइन शॉपिंग ॲपच्या नावाने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – महिलेने ऑनलाइन शॉपिंग ॲपच्या माध्यमातून खरेदी केलेल्या वस्तूची रक्कम परत घेण्यासाठी कस्टमर केअरला फोन केला. त्यावेळी महिलेची एक लाख 57 हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार 7 मे रोजी पिंपळे सौदागर येथे घडला.

याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मीशो ॲप वरील अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मीशो ॲपवरून वस्तूंची खरेदी केली. त्यांची पाठीमागील रक्कम परत घेण्यासाठी फिर्यादी यांनी कस्टमर केअरला फोन केला. त्यावेळी फिर्यादी यांचा फोन वरिष्ठ कार्यालयाकडे वळविण्यात आला. तिथे अनोळखी इसमाने फिर्यादी यांना एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.

त्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये रिक्वेस्ट एक्सेप्ट करण्यास सांगत फिर्यादींची एक लाख पन्नास हजार रुपयांची तसेच मोबी क्विक ॲपमधून सात हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.