Chinchwad : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून एका (Chinchwad) व्यक्तीने महिलेला मारहाण केली. महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 18) सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास महात्मा फुले नगर, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित चिकोडकर (रा. महात्मा फुले नगर चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा ऋणनिर्देश व सत्कार सोहळा संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटीमध्ये राहतात. फिर्यादी यांनी सोसायटीच्या पाठीमागे असलेल्या तारेच्या कंपाउंडला लावलेली तार बाजूला काढली होती. यावरून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ (Chinchwad) करून मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांचा हात पिरगाळून एका बोटाला फ्रॅक्चर केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.