Pimple Saudagar : चक्क घरासमोरून पळवली बाईक

एमपीसी न्यूज : पार्क केलेली दुचाकी पिंपळे सौदागरमधून (Pimple Saudagar) रात्री चोरीला गेली. याबाबत काशिनाथ जमादार (वय 48 वर्षे, रा. काटे चाळ, पिंपळे सौदागर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भा. द. वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 जानेवारी मध्यरात्रीपासून ते 4 जानेवारी सकाळपर्यंत या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर हि घटना घडली. फिर्यादी यांची 80 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर गाडी चोरट्याने पळवून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.