Pimpri News : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून जगताप परिवाराचे सांत्वन

एमपीसी न्यूज – विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (गुरुवारी) चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या परिवाराचे (Pimpri News) सांत्वन केले.

आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी (दि.3) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कर्करोगाशी सुरू असलेली  त्यांची झुंज अपयशी ठरली. पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपळे गुरव येथील जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Pune News : डॉ. रिता शेटीया  “ग्लोबल रायटर 2022” पुरस्काराने सन्मानित  

जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन (Pimpri News) केले. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आप्पा रेणुसे आदी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.