Pune News : डॉ. रिता शेटीया  “ग्लोबल रायटर 2022” पुरस्काराने सन्मानित  

एमपीसी न्यूज – ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी, यु.एस. ए. आणि (Pune News) सिंगापूर तर्फे डॉ. रिता मदनलाल शेटीया यांना  “ग्लोबल रायटर 2022” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. रिता या विविध विषयांवर लेखन करत असतात. त्यांचे लेख ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमिच्या वेबसाईट मधील ‘ग्रेस लेडीज रॅनडम थॉट डायरी ‘ या कॉलम मध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी ‘गिव मी सम स्पेस’, ‘शी’, ‘बी अल्वेज हॅप्पी’, ‘गुरु’, ‘अँड द जर्नी बिगेंनस’, ‘किंग ऑफ म्युझिक – शंकर महादेवन’, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – अ मेमोरेबल मिट’ आणि ‘डिजिटल रुपया’ हे लेख लिहिले असून मे ते डिसेंबर 2022 या 8 महिन्यात हे लेख या जागतिक वेबसाईट वर प्रसिद्ध झाले आहेत.

Talegaon Dabhade : थकबाकीदारांच्या मिळकतींवर नगरपरिषदेची कठोर कारवाई

लेखनातील विविधता आणि वेगवेगळे विषय तसेच त्यांच्या लेखनाने इतरांना मिळणारी प्रेरणा, यामुळे त्यांना यावर्षीचा “ग्लोबल रायटर 2022” हा पुरस्कार ग्रेस लेडीज ग्लोबल (Pune News) अकॅडमीच्या संस्थापिका डॉ. सोना पांडे यांनी दिला. ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी महिला सक्षमीकरनावर कार्य करत असून महिलांना प्रोत्साहित करण्याचे काम करत असते. यापुढेही विविध विषयांवर लेख लिहीत राहू असे आश्वासन डॉ. रिता यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.