Pimple Sudagar News : उन्नती सोशल फाउंडेशनच्या रक्तदान व आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

96 पिशव्या रक्तसंकल; 50 जेष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

एमपीसीन्यूज : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात 96 दात्यांनी रक्तदान केले, तर 50  जेष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

पिंपळे सौदागर परिसरातील नवचैतन्य क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद कुंजीर , क्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील काटे, रहाटणी येथील श्री काळभैरवनाथ कब्बडी संघाचे अध्यक्ष आदिनाथ नखाते, महाराष्ट्र कब्बडी संघाचे अध्यक्ष अमित नखाते आदींच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे ,संस्थापक संजय भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे,पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, स्वराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष सुनील कुंजीर, पी. के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, सामाजिक कार्यकर्ते शंकर चोंधे, उद्योजक राजू भिसे, उमेश शेलार, विजयकांत डुरे ,अतुल पाटील, रोहिदास गवारी, राजेंद्र जयस्वाल , विकास काटे, प्रसाद कुंजीर यांचा हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

नगरसेविका निर्मला कुटे, कुंदन झिंजुर्डे, राजू शेलार, गौरी कुटे, श्री विठाई मोफत वाचनालयात आणि अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशनचे सभासद व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

कुंदा भिसे म्हणाल्या,सध्या कोरोना महामारीचा कार्यकाळ सुरु आहे. अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्त संकलन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आयोजित रक्तदान शिबिराला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण 96 पिशव्या रक्त संकलित झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.