Talegaon Crime News : बनावट फेसबुक पेजवर कर्जाची जाहिरात देऊन महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – फेसबुकवर बनावट पेज तयार केले. त्यावर कर्ज देण्याची जाहिरात करून महिलेशी संपर्क केला. कर्जासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून काही रक्कम घेऊन कर्ज न देता महिलेची फसवणूक केली. हा प्रकार 3 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत सोमाटणे येथे घडला.

दीपाली मकरंद होडे (वय 35, रा. वराळे, ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 8852060005, 6298887707 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकवर सम्राट बालवडकर नावाने खोटे फेसबुक पेज तयार केले. त्यावरून कर्ज देतो, अशी पोस्ट टाकली. त्यानंतर 8852060005, 6298887707 या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी यांच्याशी संपर्क केला.

फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना दहा लाख रुपये कर्ज देतो असे सांगून स्टॅम्प ड्युटीसाठी 20 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन कर्ज मंजूर न करता फिर्यादी यांची फसवणूक केली.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.