PimpleSaudagar : पदयात्रा काढून घरोघरी पार्थ पवार यांचा प्रचार सुरु

एमपीसी न्यूज – काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्षमहाआघाडीचे 33, मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारासाठी रहाटणी- पिंपळेसौदागर येथे पदयात्रा काढून प्रचाराला सुरुवात केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी रहाटणी – पिंपळे सौदागर परिसरात कार्यकर्त्या सोबत पदयात्रा काढून घरोघरी प्रचार करून मतदारांना निवडणुकीत घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवार पार्थ पवार यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले.

प्रत्येक नागरिकाने घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवार पार्थ पवार यांना मत द्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.