Pimpri: उठ पार्था जागा हो; धनंजय मुंडे यांचे सूचक विधान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायापालट केला आहे. शहराच्या विकासासाठी ते जिझले आहेत.  त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे शहरवासीयांना  आवाहन करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाभारताचा दाखला देत ‘उठ पार्था जागा हो’ असे सूचक विधान करून पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारीचे संकेत दिले आहेत. पार्थबाबत बोलताना अजितदादांच्या चेहऱ्यावर हस्य फुलले होते. 
केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात ‘निर्धार परिवर्तन’ यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा आज शनिवारी (दि. 2)पिंपरी-चिंचवड शहरात आली असून सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,   शहराध्यक्ष संजोग वाघेरे,  माजी आमदार विलास लांडे,  अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके,  कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, वर्षा जगताप आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

 राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी शिरुर आणि मावळ मतदार संघातून पक्षाचा खासदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने पक्षाने कामाला देखील सुरुवात केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ निवडणूक लढविणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. पार्थ यांचा मावळ मतदार संघात राबता देखील वाढला आहे. त्यामुळे त्याला पुष्टी देखील मिळत आहे. त्यातच आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवरीबाबत सूचक विधान केल्याने राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहराचा अजितदादा यांनी अतिशय नियोजन पूर्वक विकास केला आहे.  शहरासाठी ते जीजले असून शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. आमच्या भागाचा जर कोणी असा विकास केला असता तर आम्ही डोक्यावर घेतले असते. आगामी काळात शहरातील जनतेने दादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन करत
महाभारताचा दाखला देत ‘उठ पार्था जागा हो’ असे सूचक विधान करून पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारीचे संकेत दिले आहेत.  यावेळी अजित पवार यांच्या चेहऱ्यावर देखील हस्य फुलले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.