Maval loksabha : महायुतीची सोमवारी काळेवाडीत बैठक; अजित पवार, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत  सोमवारी ( दि. 8 एप्रिल) सकाळी दहा वाजता काळेवाडी येथील रागा पॅलेस हॉटेलमध्ये महायुतीतील (Maval loksabha)  घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक व मार्गदर्शन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनी ही माहिती दिली. बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच महायुतीतील घटक पक्षांची संयुक्त बैठक होत आहे.

Maval : खासदार बारणे यांना पूर्ण सहकार्य – गणेश खांडगे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच चंद्रकांतदादा  पाटील व उदय सामंत हे नेते या बैठकीत  (Maval loksabha) मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे, विरोधकांकडून करण्यात येणारी टीका व आरोप यांना उत्तरे, प्रचाराचे नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप, सर्व घटक पक्षांमधील समन्वय अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली.

या बैठकीला मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बारणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.