Pune : शरद पवार हेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज – पुरुषोत्तम खेडेकर यांचे विधान

एमपीसी न्यूज : जेव्हा  जेव्हा आपल्या देशासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. आज आपला देश खूप अडचणीत सापडला आहे.शरद पवार साहेब आमचे आजच्या काळातील  छत्रपती शिवाजी महाराज आहेत.तेव्हा आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ  असं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक  पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.

Maval : खासदार बारणे यांना पूर्ण सहकार्य – गणेश खांडगे

अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब’  हा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे. शरद पवार हे जागतिक  तरुणाईचं  आश्वासक चेहरा आहेत. आता सध्या देश अडचणीत आला आहे म्हणून आपण सर्व मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेतल्या शिवाय थांबायचे नाही आणि आपण आपल्या कृतीतून हे करून दाखवायचे असे  पुरुषोत्तम खेडेकर यांनी पुणे  येथे परखड व्यक्त मत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.