Pimpri-chinchwad : रहाटणी येथे लेबर कॉलनीत 4 सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी झाली नाही

एमपीसी न्यूज –   रहाटणी (Pimpri – chinchwad)  येथील  सुखवानी आर्या सोसायटी समोर, तापकीर माळा, गोडांबे चौक येथे  शनिवार (दि. ६) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास 4  गॅस  सिलेंडरचा स्फोट  होऊन घरगुती साहित्य जळाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
मुख्य अग्निशमन व थेरगाव उप अग्निशमन केंद्रातील (Pimpri – chinchwad)  कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन लेबर कॉलनी येथे चार पत्रा शेडला लागलेली आग पाणी मारून पूर्णपणे विझवून आटोक्यात आणली आहे. या आगीमध्ये 7 सिलेंडर (5 किलो चे) पैकी 4 सिलेंडरचा  स्फोट  झाला असे आढळून आले.

   

 

सदर ठिकाणी  हनुमंत होले ( लिडिंग. फायरमन) , सारंग मंगळूरकर ( लिडिंग.फायरमन ) व इतर तेरा कर्मचारी तत्परतेने हजर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.