Today’s Horoscope 07 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 07 April 2024– जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 07.04.2024.

शुभाशुभ विचार – क्षय तिथी.

आज विशेष – शिवरात्री.

राहू काळ – सायंकाळी 04.30  ते  06.00.

दिशा शूल – पश्चिमेला असेल.

आज नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा 22.18 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.

चंद्र राशी – 7.39 पर्यंत कुंभ नंतर मीन.
—————————–
मेष ( शुभ रंग- निळा)

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होईल, सतर्क रहा.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

आज कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र आज सावध रहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

मिथुन (शुभ रंग – आकाशी)

अत्यंत आनंदी उत्साही असा आजचा दिवस असून एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात तुम्ही आज करू शकता. आज तुम्ही फक्त आपल्या ध्येयप्राप्तीस प्राधान्य द्याल.

कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध उन घडल्याने नैराश येईल. आज हातचे सोडून पळता मागे धावायचा मोह होईल. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा, स्वतःवर संयम गरजेचा आहे.

सिंह ( शुभ रंग- डाळिंबी)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.

कन्या (शुभ रंग- सोनेरी)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात काही मतभेद संभवतात.

तूळ (शुभ रंग- केशरी)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील आज तब्येत थोडीशी नरम असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका.

वृश्चिक ( शुभ रंग- क्रीम)

तुमच्या प्रामाणिक मेहेनती आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढता येईल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

धनु (शुभ रंग- पांढरा)

व्यापार उद्योगाला पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देतील. आईने दिलेले सल्ले आज महत्त्वपूर्ण असतील.

मकर (शुभ रंग- भगवा)

जुन्या ओळखीतून आज काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल.जमगृही आज मन स्वच्छतेचे मनावर घेतील.

कुंभ ( शुभ रंग- जांभळा)

धंद्यातील येणी अनपेक्षीत पणे वसूल होतील. मृदू वाणीने आज तुम्ही विरोधकांनाही आपलेसे कराल आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवा.

मीन (शुभ रंग- जांभळा )

महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा. तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.