Pimpri Corona News : शहरात आज 1 हजार 13 नवीन रुग्णांची नोंद,  518 जणांना डिस्चार्ज, 18 मृत्यू

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 28 हजार 65 वर पोहोचली आहे. ; 1 thousand 13 new patients were registered in the city today, 518 people were discharged, 18 died

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 987 आणि पालिका हद्दीबाहेरील 26 अशा 1013 नवीन कोरोना रुग्णांची आज (शनिवारी) भर पडली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 518 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 28 हजार 65 वर पोहोचली आहे.

आज 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सहयोगनगर येथील 55 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 55 वर्षीय पुरुष, भोसरीतील 72, 62 वर्षीय दोन पुरुष, डांगे चौक येथील 63 वर्षीय महिला, वाल्हेकरवाडीतील 67 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 55 वर्षीय पुरुष, चिखलीतील 81 वर्षीय वृद्ध, चिंचवड येथील 35 वर्षाचा युवक, 56, 62 वर्षीय पुरुष,  थेरगावातील 63 वर्षीय महिला,   पिंपरीतील 50, 63 वर्षीय पुरुष, स्पाईन रोड, भोसरीतील 35 वर्षीय युवक आणि चाकण येथील 50,60 वर्षीय दोन पुरुष, देहुरोड येथील 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 28 हजार 65 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 19,312 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील  475 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 109 अशा 584 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 4851 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.