Pimpri : पवना धरणातून 1400 क्यूसेक्सने विसर्ग; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – मागील काही ( Pimpri ) दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून जोरदार हजेरी लावली आहे. पवना धरण 100  टक्के भरले असून धरणातून 1400 क्यूसेक्सने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

PCMC : शहरातील 2 लाख 69 हजार घरांचा सर्व्हे;  5 हजार 459 कंटेनरमध्ये आढळल्या डासांच्या अळ्या

पवना धरण 100% टक्के क्षमतेने भरलेले आहे.  विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी 9:30 वाजता 800 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. हा विसर्ग 12 वाजता वाढवून 800 क्यूसेक्स वरून 1400 क्यूसेक्स करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.

पवना नदी काठच्या सर्व नागरीकांनी सतर्क रहावे.  नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने ( Pimpri ) केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.