PCMC : शहरातील 2 लाख 69 हजार घरांचा सर्व्हे;  5 हजार 459 कंटेनरमध्ये आढळल्या डासांच्या अळ्या

एमपीसी न्यूज –  डेंग्यू, मलेरिया यांसारख्या (PCMC) रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येते. यासाठी 1 जून ते 29 ऑगस्ट या कालावधीत आरोग्य विभागाने शहरातील 2 लाख 69 हजार 754 घरांची तपासणी करून 13 लाख 29 हजार 203 कंटेनरची तपासणी केली. यामध्ये 5 हजार 459 कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

Aditya L1 Mission : Aditya L1 ने घेतली यशस्वी झेप

992 टायर आणि भंगार दुकाने, 1154 बांधकामांची तपासणी करून 3 हजार 530 कंटेनर रिकामे केले. यामधील 1 हजार 211 जणांना नोटीस दिल्या. डास आढलेल्या घरगुती आणि व्यावसायिक मालमत्तांकडून तब्बल 8 लाख 82 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. घरगुती अस्थापनांना 1 हजार, व्यावसायिक अस्थापनांना 2 हजार तर मॉल, हॉस्पिटल, बांधकाम सुरू असलेल्या इमारत यांना 10 हजारांचा दंड आकारण्यात येतो, अशी माहिती आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.

वाढत्या शहरीकरणामुळे शहर परिसरात हवा-पाण्याचे प्रदूषण मोठ्या (PCMC) प्रमाणावर होत आहे. त्यामुळे साथीच्या रोगांनी शहरात थैमान घेतले असून, गेल्या काही दिवसांत डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्या यांतून, तसेच रुग्णालये, निर्माणाधीन बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजाविण्यात येत आहेत.

दरम्यान, शहरात डेंग्यूचे रूग्ण सातत्याने आढळून येत आहेत. डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महापालिका डास उत्पत्तीचे ठिकाण आढळणाऱ्या आस्थापनांना सुरुवातीला नोटीस देते. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही देशपांडे (PCMC) यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.