HB_TOPHP_A_

Pimpri: महापालिकेने 215 अवैध नळजोड तोडले; पाणी चोरीचा गुन्हे दाखल करणार

375

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध नळजोड धारकांवरील कारवाई तीव्र केली आहे. पाणीपुरवठा विभागाने 215 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच पाणी चोरीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले. 

HB_POST_INPOST_R_A

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले आहेत. त्यामुळे 30 ते 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तसेच दुषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण केले. अनधिकृत नळजोड धारकांनी नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. तथापि, नागरिकांचा त्याला अल्प प्रतिसाद मिळाला.

अनधिकृत नळजोडच्या सर्वेक्षणात शहरात केवळ 16 हजार अवैध नळजोड सापडले. यापैकी नियमित करण्यासाठी पाच हजार 14 जणांनी अर्ज केले होते. पाणी पुरवठा विभागाने दोन हजार 964 अर्ज मंजूर केले. तथापि, शहरातील अनधिकृत नळजोडची 16 हजार ही संख्या अतिशय नगण्य असून यापेक्षा शहरात अधिक अवैध नळजोड आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अवैध नळजोड धारकांवर धडक कारवाई सुरु केली आहे. 215 नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यापुढे देखील ही कारवाई तीव्र केली जाणार आहे.

सह शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ”ज्यांची अनधिकृत नळजोड आहेत आणि ज्यांनी अर्ज भरले नाहीत, असे नळजोड तोडले जात आहेत. दोन नळजोड धारकांवार देखील कारवाई केली जात असून विभागनिहाय कारवाई केली जात आहे. अवैध नळजोड धारकांवर पाणी चोरीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी कायदा विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे. कायदा विभागाचा अभिप्राय प्राप्त होताच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे”.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: