Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 48.84 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळी सात पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 48.84 टक्के मतदान झाले.  चिंचवड मतदारसंघात 51.33 टक्के,  पिंपरी मतदारसंघात 42.67 टक्के तर भोसरी मतदारसंघात  52.52 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

 

सकाळी 11 वाजेपर्यंत पिंपरी 11.70 टक्के, चिंचवड – 16.37 टक्के तर भोसरी – 13.83 टक्के अशी मतदानाची आकडेवारी आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात 13 लाख 12 हजार 979 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

दुपारी 3 पर्यंत झालेले मतदान

पिंपरी – 31.28 टक्के

चिंचवड – 35.79   टक्के

भोसरी – 39.82  टक्के

दुपारी 1 पर्यंत झालेले मतदान

पिंपरी – 21.64 टक्के

चिंचवड – 34.41% टक्के

भोसरी – 26.52% टक्के

सकाळी 11 पर्यंत झालेले मतदान

पिंपरी – 11. 70 टक्के

चिंचवड – 16.37 टक्के

भोसरी – 13.83 टक्के

सकाळी नऊ पर्यंत झालेले मतदान

पिंपरी – 4.01 टक्के

चिंचवड – 6.10 टक्के

भोसरी – 5.11 टक्के

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.