Pimpri : महिलेला अश्लील मॅसेज करणाऱ्यावर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – इन्स्टाग्राम अकाऊंटवर( Pimpri) अश्लिल शब्द वापरून महिलेचा विनयभंग केल्याप्रकऱणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 13 मे रोजी पिंपरी येथे ऑनलाईनपद्धतीने घडली आहे.
PM Modi Pune Live : टिळकांचे पुण्यात आगमन म्हणजे संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याची ठिणगी – शरद पवार
याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.31) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Shar_u1549 या अकाऊंट धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अकाऊंटवरून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या अकाऊंटवर अश्लील मॅसेज करून फिर्यादीचा विनयभंग केला. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत ( Pimpri) आहेत.