Pimpri: ‘आम आदमी पार्टी’ची कार्यकारिणी जाहीर; शहराध्यक्षपदी अनुप शर्मा

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टीने पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारिणी जाहीर केली आहे. शहराध्यक्षपदी शहराध्यक्ष अनुप शर्मा यांची तर सचिवपदी राघवेंद्र राव आणि महिला अध्यक्षपदी स्मिता पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी महापालिकेची आगामी निवडणूक लढवेपर्यंत कार्यकारिणी काम करणार असल्याचे  मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

आम आदमी पार्टीची आज (बुधवारी) चिंचवडमध्ये पत्रकार परिषद झाली.  पुण्याचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी पिंपरी-चिंचवडची कार्यकारिणी जाहीर केली.  संघटनमंत्री डॉ. अभिजीत मोरे उपस्थित होते.

अध्यक्ष अनुप शर्मा, सचिव राघवेंद्र राव, कोषाध्यक्ष सुशील अजमेरा, उपाध्यक्ष महेश बिराजदार, संदीप देवरे, प्रज्ञेश शितोळे, प्रवक्ता कपील मोरे, अल्पसंख्याक विभाग यशवंत कांबळे, सदस्य सुजय शेठ, चेतन बेंद्रे, राज चकने, अरविंद देवगडे, उमेश साठे, वहाब शेख यांच्या कार्यकारिणीत समावेश आहे. तर, महिला शहराध्यक्षपदी स्मिता पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना किर्दत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.