Pimpri: आण्णाभाऊंची शाहिरी मनावर अधिराज्य गाजविणारी – जयदेव गायकवाड

एमपीसी न्यूज – पृथ्वी ही शेषाच्या नागावर उभी आहे असे म्हणले जायचे. परंतु, आण्णाभाऊ साठे यांनी पृथ्वी ही कष्टकरी, मजुरांच्या तळहातावर तरली आहे, असे सांगून आण्णाभाऊंची शाहीरी संयुक्त महाराष्ट्रासाठी सतत प्रेरणा देत राहिली. त्यामुळे 107 लोकांनी प्राणांची आहुती दिली. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी शाहिरी आहे, असे मत राष्ट्रवादीच्या सामाजिक व न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ऑटो क्‍लस्टर येथे जाहीर अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक नाना काटे, राजू बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, प्रज्ञा खानोलकर, गोरक्ष लोखंडे, अरूण बोऱ्हाडे, निलेश पांढारकर, सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष पंडीत कांबळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, दीड दिवसाची शाळा शिकून आण्णाभाऊंनी प्रेरणादायी साहित्य लिहले. आण्णाभाऊचे साहित्य आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी गायलेली शाहिरी आजही तितकीच प्रेरणादायी, रोमांचकारी सामाजिक सलोखा प्रस्थापित करणारी आहे. आजही सतत ऐकावी असे वाटते, आण्णाभाऊ साठे यांचे विचार आता तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी नव्या पिढी समोर मांडणे गरजेचे आहे. तसेच आण्णाभाऊंच्या जयंतीदिनी मराठी दिन साजरा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.