Pimpri : ॲप डाऊनलोड होताच झाली पावणेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज  – अज्ञात व्यक्तीने पाठवलेले ॲप आपोआप मोबाइलमध्ये (Pimpri)  डाऊनलोड झाले. त्याद्वारे अर्ज न करताही कर्ज मंजूर होऊन 2 लाख 88 हजार 7 96 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 8 ते 10 ऑक्‍टोबर 2023 दरम्यान उद्यमनगर, पिंपरी येथे घडली.
अनिश पद्मनाभ करंदीकर (वय 44, रा. उद्यमनगर, पिंपरी) यांनी (Pimpri) मंगळवारी (दि. 17) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9360420124 या मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी यांनी मोबाईल नंबर वरून फिर्यादी यांच्या व्हाॅट्‌सॲपवर आयसीआयसीआय बॅंकेचा लोगो असलेले ॲप पाठवले. ते ॲप फिर्यादी यांनी उघडले असता ते ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल झाले. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना ॲपमध्ये वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितली. मात्र फिर्यादी यांनी त्यास नकार दिला.
त्यानंतर फिर्यादी यांच्या आयसीआयसीआय बॅंक खात्यात 20 लाख 65 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला. सदरचे कर्ज खात्यात आल्यावर काही वेळात रक्कम बॅंकेच्या खात्यात जमा झाली. त्यानंतर फिर्यादी यांच्या आयसीआयसीआय बॅंकेच्या क्रेडिट कार्ड वरून दोन लाख 88 हजार 796 काढून घेत फिर्यादी यांची फसवणूक (Pimpri) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.