Pimpri : लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून पुढच्या चौकात सोड असे म्हणत दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. दुचाकीवर बसल्यानंतर दुचाकीस्वाराला धमकी देत त्याची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 24) कैलास डेअरी जवळ मोहननगर येथे घडली.

गणेश गोवार्दन घोडेस्वार (वय 27, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना वापरण्यासाठी कंपनीने दुचाकी (एम एच 03 / सी झेड 5690) दिली आहे. ती दुचाकी घेऊन रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ते मोहननगर मधील कैलास डेअरी येथून जात होते. त्यावेळी अज्ञात दोन आरोपींनी त्यांना लिफ्ट मागितली. गणेश यांनी लिफ्ट दिली असता आरोपींनी त्यांना धमकी देऊन दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. याबाबत बुधवारी (दि. 27) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.