Wakad : कार चालकाला अडवून मारामारी करत लुटले; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – कार मधून जाणा-या दोघांना अडवून मारामारी केली. कारची तोडफोड करून कार चालकाच्या खिशातून 30 हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 26) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिवार चौकाजवळ पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

भरत शाम पालमपल्ले (वय 23, रा. पिंपळे सौदागर), महेश उर्फ राहुल लक्ष्मण सावंत (वय 23, रा. थेरगाव), नितेश लक्ष्मण लांडगे (वय 21, रा. रहाटणी रस्ता, पिंपळे सौदागर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रुपेश मोहन तापकीर (वय 32, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी रुपेश आणि त्यांचा मित्र सुरज पवार हे दोघेजण त्यांच्या कार (एम एच 12 / एल एस 80) मधून जात होते. शिवार चौकाजवळ सब वे हॉटेल समोर आले असता त्यांच्या आरोपींनी त्यांना अडविले. आरोपी हे मोहन यांच्या ओळखीचे असल्याने त्यांनी कार थांबवली. त्यावेळी आरोपींनी मोहन आणि सुरज यांना धमकी देत कारच्या काचा फोडल्या. तसेच दोघांना मारहाण करत मोहन यांच्या खिशातून जबरदस्तीने 30 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.