Pimpri: पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कॉल सेंटर ; 48 शिक्षकांची नेमणूक

Call centers in all the eight regional offices of the municipality; Appointment of 48 teachers :प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील कॉल सेंटरमध्ये सहा शिक्षकांची नेमणूक राहणार आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना रूग्णांचा वाढता संक्रमणाचा धोका विचारात घेऊन पिंपरी-चिंचवड पालिकेमार्फत शहरातील सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. या कॉल सेंटरमध्ये पालिकेच्या शाळांमधील 48 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील कॉल सेंटरमध्ये सहा शिक्षकांची नेमणूक असेल.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

कोरोना रूग्णांचा वाढता संक्रमणाचा धोका विचारात घेऊन शहरात कार्यरत असणा-या विविध प्राधिकरणांच्या उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, सहायक निबंधक या पदावरील अधिका-यांची पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना विषयक कामकाज करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याच अनुषंगाने महापालिका शाळांमधील शिक्षकांचेही आता कोरोना कामकाजासाठी योगदान लाभणार आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कॉल सेंटर स्थापन करण्यात आले आहेत.

या कॉल सेंटरमध्ये कर्मचा-यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असणा-या 48 शिक्षकांची या कॉल सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

या शिक्षकांनी 15 ऑगस्ट पर्यंत कॉल सेंटरचे कामकाज पाहायचे आहे. या शिक्षकांनी नोडल अधिकारी निळकंठ पोमण आणि समन्वय अधिकारी थॉमस नरोना यांच्या सुचनेनुसार कामकाज करायचे आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तयारी पूर्ण क्षमतेने चालू आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयात कॉल सेंटर चालू केले जाणार आहेत. प्रभागस्तरावर वॉर रुम चालू झाल्या आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like