Pimpri News : पिंपरी कॅम्प परिसरातील फुल विक्रेत्यांची घबासष्ठी उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज – सालाबाद प्रमाणे यंदाही फुल विक्रेत्यांकडून घबाडसष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वर्षभरातील व्यवहार सुरळीत करण्यात आले तसेच दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांना बाॅनस तसेच शेतकऱ्यांचा जुना व्यवहार पुर्णपणे क्लीअर करण्यात आला.

या दिवशी दुकानातील काटा माप, बीलबूक, वर्षभरातील थकबाकी हिशोब करून व्यवहार सुरळीत केला जातो. आपल्या दुकानाला फूलांचे आकर्षक तोरण बांधून सजावट करून घबाडसष्ठी साजरी करण्यात येते असे फुल विक्रेते गणेश आहेर यांनी संगितले.

याप्रसंगी फूल बाजाराचे अध्यक्ष राजकुमार मोरे, बाजार समिती विभागप्रमूख राजु शिंदे साहेब, दत्तात्रय फुले, शिवाजी सस्ते, गणेश आहेर, बाबा रासकर, संजय बोडके, मिना आहेर, सुनील काळे, दत्तात्रय ठाक्कर, बाबा तापकिर, मामा राक्षे, नितीन रासकर, अजय हांडभर, प्रणित बडदे, बाळु वाघोले, संतोष जाधव, संतोष फुले, शाम मांडगे, आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.