Kharalwadi News: पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे कोरोना योद्धा महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे कोरोना योद्धा महिलांचा सन्मान करण्यात आला. भाऊबीजेच्या दिवशी खराळवाडी परिसरातील कोरोना योध्या महिलांचा सन्मान करून त्यांना दिवाळी फराळचे वाटप करण्यात आले. शिवाय त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार सुद्धा मानले.

प्रतिष्ठानकडून दीपावली निमित्त गेली 7 वर्षे विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये आदिवासी भागातील आणि वंचित अशा लोकवस्तीमध्ये जाऊन त्यांच्यासोबत दीपावली साजरी केली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि महिला भगिनींना साडीसह फराळ देण्यात येतो. सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी या कार्यात बदल करण्यात आला देशात कडक ताळेबंदी आसल्याने केवळ अत्यावश्यक सेवाच चालू होत्या.

आरोग्य सेवा व सफाई कामगार यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे आपले कार्य अविरत सुरू ठेवले. त्यामुळेच आपण कोरोनाचा प्रसार थांबविण्यात यशस्वी ठरलो. आरोग्य सेवकांनी लस उपलब्ध झाल्यापासून स्वतः ला संपूर्ण झोकून दिले. त्यामुळे लोकसंख्येबाबत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून देखील देशाने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा काही महिन्यातच पार केला, असे प्रतिष्ठानने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.