Pimpri Chinchwad : कै.तुकाराम तनपुरे फॉउंडेशन गणेशोत्सवात करते विविध सेवाकार्य

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad)परिसरात गणेशोत्सवाच्या काळात अनेक वर्षापासून कै.गणेश तनपुरे फॉउंडेशन नागरिकाक आणि प्रशासन यांच्यासाठी विविध सेवा पुरविण्याचे कार्य करत असून यावर्षीही त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात सेवा पुरविण्याचे कार्य करण्यात येत आहे.

Pune : स्वच्छता पंधरवड्या निमित्त पुणे रेल्वे विभागात स्वच्छता मोहीम

गणेशोत्सव काळात पहिल्या दिवस पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत पोलिस मित्र, पर्यावरण मित्र, आरोग्य मित्र अशा विविध भूमिका फॉउंडेशनच्या स्वयंसेवकांमार्फत बजावण्यात येतात.  या सेवा कार्यात शहरातील विविध विसर्जन घाटाच्या ठिकाणी स्वयंसेवकांमार्फत निर्माल्य दान तसेच मूर्ती संकलन करून पालिका आणि पोलीस प्रशासन यांना सहकार्य करण्यात येते.

यावर्षी देखील  संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी सुमारे ६५ स्वयंसेवक प्रामुख्याने घरकुल, मोशी, चिखली प्राधिकरण याठिकाणी सेवा पुरविण्याचे कार्य करत आहेत. त्याचबरोबर पोलिस प्रशासनाच्या  कार्यात खारीचा उचलत रात्रपाळी बंदोबस्तात अनेक स्वयंसेवक गेले अनेक दिवस सेवा देत असल्याचे कै.तुकाराम तनपुरे फॉउंडेशनचे अध्यक्ष अशोक तनपुरे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.