Pimpri: महापालिकेतर्फे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे व जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य लक्ष्मण उंडे, माजी नगरसदस्या आशा सुपे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, प्रभारी क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, लेखाधिकारी वसंत उगले, कार्यालयीन अधीक्षक सोमा आंबवणे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब तिटकारे, पांडुरंग परचंडराव, वसंत रेंगडे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.