Pimpri news: भाजपातर्फे ‘माऊली ते मोरया’महाआरती अन् आनंदोत्सव!

शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने आनंदोत्सव आणि ठिकठिकाणी महाआरती करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर ते चिंचवडमधील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिरापर्यंत सर्व ग्रामदैवतांच्या मंदिरांसह सर्वधर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये सोमवारी भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, श्रद्धास्थानं असलेली मंदिरं ताबडतोब उघडावीत या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य, साधु-संत, सर्व धार्मिक संस्था-संघटना एकत्र येत भारतीय जनता पक्ष अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नेतृत्वात राज्यव्यापी लाक्षणिक उपोषणे व आंदोलनं करण्यात आली होती. शेवटी भारतीय जनता पक्षाने केलेल्या या आंदोलनांना व संघर्षाला यश मिळाले आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तब्बल नऊ महिन्यानंतर सर्वधर्मीय मंदिरे उघडण्यात आली आहेत. माऊलींची आळंदी ते मोरया गोसविंचे चिंचवड व्हाया भोसरी मतदार संघातील सर्व ग्रामदैवत असा दर्शन-आरती प्रवास केला.

याठिकाणी साजरा केला आनंदोत्सव!
श्रीक्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर, भोसरी मतदार संघातील टाळगाव चिखली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मोशीतील नागेश्वर मंदिर, जाधववाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, दिघीतील दत्तमंदिर, भोसरीतील महादेव मंदिर, इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता मदिर, नेहरुनगर येथील गणपती मंदिर, रुपीनगर-तळवडे येथील घारजाई मंदिर यांसह चिंचवड विधानसभा मतदार संघातील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिराध्ये महाआरती आणि आनंदोत्सव उपक्रमाचा समापोर करण्यात आला.

महापौर उषा ढोरे, महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश सरचिटणीस अमित गोरखे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विजय फुगे, राजू दुर्गे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका मोनाताई कुलकर्णी, करुणा चिंचवडे, संगीता भोंडवे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, विनोद तापकीर, विठ्ठल भोईर, संदिप गाडे, संदिप नखाते, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चौंधे, प्रदेश युवा उपाध्यक्ष अनुप मोरे, महीला अध्यक्ष उज्वला गावडे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, प्रमोद ताम्हणकर, चिंचवड-किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, शहर उपाध्यक्ष काळूराम बारणे, धनंजय शाळीग्राम, विनोद मालू, संजय पटनी, सुरेश पाटील, हरीभाऊ चिंचवडे, दिपक गावडे, नारायण लांडगे, पांडूरंग चिंचवडे, देवदत्त लांडे, मिथुन बोरगांव, राहुल मोकाशी, स्वप्निल भोईर, राजू लांडगे यांच्यासह कुंदा भिसे, पल्लवी वाल्हेकर, दिपाली धानोकर, रेखा कडाली, सुमन जांभूळकर, रंजना चिंचवडे, प्रतीभा चिंचवडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते ‘महाआरती व आनंदोत्सवात’ सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.