Bhosari : सावरकर गौरव यात्रेला सुमारे 37 हजार नागरिकांची उपस्थिती;  ‘मी सावरकर’च्या जयघोषाने भोसरीसह परिसर दणाणला

एमपीसी न्यूज – ‘‘ भारत माता की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मी सावरकर, आम्ही सावरकर…’’ असा गगनभेदी घोषणा, ढोल-ताशा पथकाचा (Bhosari) निनाद आणि सुमारे 37 हजार राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या साक्षीने भोसरी विधानसभा मतदार संघात राज्यातील सर्वात मोठी ‘सावरकर गौरव यात्रा’ संपन्न झाली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना महायुतीच्या पुढाकाराने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या पुढाकाराने बुधवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.  भोसरी पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. तेथून दिघी रोड, हरी ओम स्वीट, आळंदी रोड, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे यात्रेची सांगता करण्यात आली.

Pimpri : पाणीटंचाईच्या तक्रारी सोडवण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वतंत्र समित्यांची पुनर्रचना करावी; उच्च न्यायालयाचे निर्देश

यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, गोरक्षक शिवशंकर स्वामी, स्थायीचे माजी सभापती विलास मडिगेरी, नितीन लांडगे, संतोष लोंढे, यांच्यासह भाजपा- शिवसेना महायुतीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यासह भाजपा परिवातील सर्व संस्था, संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या 15 दिवसांपासून सावरकर गौरव यात्रेची तयारी सुरू होती. मतदार संघातील महापालिका प्रभागनिहाय सावरकर प्रेमी नागरिकांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.(Bhosari) त्यामुळे यात्रेचा प्रचंड गर्दी झाली. पोलीस प्रशासनाच्या अचूक नियोजनामुळे यात्रा यशस्वी झाली. सावरकर प्रेमी नागरिक आणि हिंदूत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात यात्रेत सहभाग घेतला.

भोसरी आणि परिसर भगवामय…

भारत माता की जय, जय श्रीराम,  वंदे मातरम्‌, वीर सारकरांचा विजय असो, हिंदू हित की बात करेगा वहीं देश पे राज करेगा..!  अशा घोषणा सहभागी सावरकर प्रेमी नागरिकांनी दिल्या. ढोल-ताशा पथकाचा खणखणाट, डोक्यावर सावरकर टोपी, हातात ‘आम्ही सावरकर’ असे फलक,  भगव्या टोप्या त्यावर ‘मी सावरकर’ चा उल्लेख, महिलांची लक्षणीय उपस्थिती, वीर सावरकरांचा पोशाख  केलेल्या व्यक्तीबरोबर सेल्फीचा आनंद, भगवा ध्वज दिमाखात फडकवताना कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यामुळे भोसरी आणि परिसर अक्षरश: भगवामय झाला होता.(Bhosari)‘‘सावरकरांनी अंदमानला शिक्षेसाठी घेवून जाताना समुद्रात घेतलेली उडी…’’ असा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. प्रभू श्रीराम आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराचा चित्ररथ, कमळाच्या प्रतिकृतीमध्ये ठेवलेला वीर सावरकरांचा पुतळा लक्ष वेधून घेत होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.