Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड बहुजन महापुरुष सम्मान समितीची निदर्शने

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड बहुजन महापुरुष सम्मान समितीच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील  (Pimpri Chinchwad) यांच्यावर शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी टाकण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी चिंचवडगावमधील चाफेकर चौकामध्ये निदर्शने करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते व स्वराज अभियानचे मानव कांबळे, मारुती भापकर यांची भाषणे झाले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त चाफेकर चौकात होता. यावेळेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून भीक मांगो आंदोलन (Pimpri Chinchwad) करण्यात आले. त्यामध्ये लोकांनी पैसे दान केले.

NCP : मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटपास नागरिकांचा प्रतिसाद

त्यानंतर सर्व कार्यकर्ते पिंपरी येथील मोरवाडी कोर्टाकडे रवाना झाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना आता कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.