NCP : मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटपास नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण सेंटर जतन फाउंडेशन (NCP) व खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचे उदघाटन ऍड. अशोक अढूळकर, पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष काका चव्हाण, निवृत्ती येनपुरे, नितीन पाटील, अरुण पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Dehuroad : भरदिवसा अवघ्या दोन तासात घरातून 2 लाख 40 हजार चोरीला

बराटे प्रॉपर्टीज व्हायोला सोसायटी गेट समोर, सिप्ला हॉस्पिटल रस्ता वारजे (NCP) येथे आज (रविवार) सकाळी 10 ते दुपारी 4 यादरम्यान नागरिकांसाठी हा कार्यक्रम सुरू होता. शिवाजी भोईने, अनिल गायकवाड, महादेव गायकवाड, नंदकुमार बोधाई, विठ्ठल पासलकर, देवेंद्र सूर्यवंशी, नीलम डोलसकर, भावना पाटील, नंदकिशोर बडदे, धनंजय म्हसे, राजू धोत्रे, राजाभाऊ ताकवले, यशवंत ठोकळ, विष्णू सरगर, मानसी नलावडे, उषा दुर्वे, संजय हिंगे, राजकुमार शिंदे, मनीष धुमाळ यावेळी उपस्थित होते. वारजे – माळवाडी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असून, त्यांच्यासाठी नेहमीच आम्ही अशा कार्यक्रमांना प्राधान्य देत असल्याचे आयोजक बाबा धुमाळ आणि दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.