Dehuroad : भरदिवसा अवघ्या दोन तासात घरातून 2 लाख 40 हजार चोरीला

एमपीसी न्यूज – आजोबा आणि नातवंड खेळण्यासाठी (Dehuroad) घर बंद करून बाहेर गेले असता, दोन तासात घरातील 2 लाख 40 हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. हा प्रकार देहुगाव येथील संत तुकाराम सोसायटीमध्ये दुपारी साडे तीन ते साडे पाच या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी आमीर इसाक शेख (वय 27 रा. देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune : निसर्गचित्र साकारताना तांत्रिक मुद्द्यात अडकू नका – मिलिंद मुळीक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आजोबा फिर्यादीच्या सात (Dehuroad) वर्षाच्या मुलाला घेऊन दुपारी साडे तीनच्या सुमारास परिसरात खेळण्यासाठी गेले. यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करत घराच्या बेडरुमचा दरवाजा चावीच्या सहाय्याने उघडला, चावी दरवाजालाच ठेवली. रुममधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील 2 लाख 30 हजारांचे 46 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख 10 हजार रुपये असे एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.