Pune : निसर्गचित्र साकारताना तांत्रिक मुद्द्यात अडकू नका – मिलिंद मुळीक

एमपीसी न्यूज : निसर्गचित्र साकारताना (Pune) तांत्रिक मुद्द्यात अडकू नका, निसर्गातील रंगछटांकडे लक्ष द्या, कुठे थांबायचे याचा योग्य वेळी निर्णय घ्या, अशा शब्दात प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांनी आज (दि. 10 डिसेंबर) नवोदित चित्रकारांच्या तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

जलरंगातून साकारलेला निसर्ग, व्यक्तिचित्रे, जुन्या पुण्यासह ग्रामीण आणि शहरी भागाचे सौंदर्य दर्शविणाऱ्या कलाकृतींचे ‘गुरुदक्षिणा’ हे चित्रप्रदर्शन दर्पण आर्ट गॅलरी येथे भरविण्यात आले आहे. मुळीक यांच्याकडे प्रशिक्षण घेत असलेल्या 24 चित्रकारांच्या चित्रकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाअंतर्गत मिलिंद मुळीक यांनी आज जलरंगातून प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत कला प्रत्यक्षात कशी साकारावी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शन रविवारी (दि. 11 डिसेंबर 2022) सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळात खुले आहे.

मिलिंद मुळीक आणि जलरंग हे एक अतूट समीकरण (Pune) आहे. कागदावर जलरंगात अत्यंत वेगाने चित्र रेखाटणे हे त्यांचे कौशल्य आहे. तंत्रकौशल्य आणि सर्जनशिलता यांचा अनोखा संगम त्यांच्या चित्रांमधून दिसून येतो याची प्रचिती आज आली.

Chinchwad : तक्रार केली म्हणून मुलीच्या दिराकडून महिलेला मारहाण

चित्रकार चित्र रेखाटताना त्या चित्रात रममाण होतो त्यामुळे त्याला चित्र काढणे कुठे थांबवायचे हे उमजत नाही त्यावेळी चित्र काढता काढता दोन पावले मागे जाऊन आपल्याच चित्राचे अवलोकन केल्यास कुठे थांबायचे याचा अंदाज येऊ शकतो, असे मुळीक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. रंगसंगती कशी साधावी, ब्रश कोणत्या प्रकारचे वापरावे, चित्र ज्या कागदावर साकारण्यात येणार आहे त्याची निवड कशी करावी, अशा प्रश्नांना मुळीक यांनी उत्तरे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.