Dog Bite Cases: कुत्रा चावण्याच्या घटना रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन

एमपीसी न्यूज: कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (Dog Bite Cases) या घटना रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी अरूण दगडे यांनी केले आहे.

 

लहान मुलांना बाहेर एकटे सोडू  नये. वयस्कर माणसे त्यांच्याबरोबर असायला हवीत. मुलांना कुत्र्याची पिल्ले आवडतात. पण त्यांनी रस्त्यावर कुत्र्याची पिल्ले दिसली तर लगेच त्यांना पकडू नये कारण त्यांची आई जवळच असू शकते व ती मुलांना चावू शकते. काही अगाव मुले कुत्र्यांना दगड किंवा इतर काही वस्तू फेकून मारतात. तसे केल्यास कुत्रे त्यांना चावू शकतात व जखमी करू शकतात. तसेच विनीच्या हंगामात कुत्रे आक्रमक होतात त्यामुळे या काळात भटकया कुत्र्यांपासून दूर राहावे. तसेच कुत्रे  गाडीच्या मागे पळत असतील तर दुचाकीस्वरांनी त्यांच्या दुचाकीचा वेग कमी करावा असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी अरूण दगडे यांनी केले आहे.

Sushma Andhare : आंबेडकरी विचारांची तोफ सुषमा अंधारे शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज प्रवेश करणार

इंटरनेट वर शोधल्यासआपल्याला आणखी खूप खबरदारीचे उपाय मिळतील. भुंकणाऱ्या कुत्र्याजवळ जाऊ नये. झोपलेला, खात असलेला किंवा खेळणी चावत असलेल्या कुत्र्याला स्पर्श करू नये. जर कुत्रा त्याचे दात दाखवत असेल तर तो तणावात असू शकतो अशावेळी त्याच्याजवळ जाऊ नये. अनोळखी कुत्र्याजवळ जाऊ नये. कुत्र्यासापासून लांब जाण्यासाठी पळू नका किंवा ओरडू नका शांत राहा कुत्रा कदाचित जवळ येऊन तुमचा वास घेईल व निघूऊ जाईल.

 

अनोळखी कुत्र्याकडे त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू नये कारण त्यांना तुम्ही प्रतिस्पर्धी वाटाल. कुत्र्याजवळ अचानक जाऊन त्याला घाबरवू नका. तुम्ही जर जॉगिंग किंवा सायकल चालवत असाल तर कुत्र्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. त्याचा मार्ग ओलांडू नका कारण तो तुमचा पाठलाग करू शकतो व चावूही शकतो. (Dog Bite Cases) जर दुर्दैवाने कुत्रा पाठलाग करताना किंवा तुमच्यावर झडप घातली व तुम्ही खाली पडलात तर तुम्ही चेंडू (बॉल) सारखे गोळे व्हा. तुमचे हातांना, चेहरा व मानेला झाका आणि शांत राहा.
पाळीव कुत्र्यांबाबत घ्यावयाची काळजी:
नियमितपणे त्याच्याबरोबर व्यायाम करा आणि खेळा. त्यामुळे त्याची अतिरिक्त ऊर्जा वापरली जाईल व तो आक्रमक होणार नाही.
त्याच्याबरोबर कुस्ती किंवा रस्सीखेच सारखे आक्रमक खेळ खेळू नका.

नियमित लसीकरण करा
घरात मुले असतील तर त्यांना कुत्र्याबरोबर कसे वागावे, कुत्र्याने हल्ला केला तर काय करावे ई. शिकवावे
बस, थांब, ये असे सामान्य सूचना पाळायला शिकवा
मुलांनी कुत्र्याच्या शरीरावरील जखम झालेल्या ठिकाणी हात लावू नये
मुलांना शिकवा की कुत्र्यापुढे अचानक येऊन घाबरवू नका किंवा झोपलेल्या कुत्र्यास छेडू नका

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.