Sushma Andhare : आंबेडकरी विचारांची तोफ सुषमा अंधारे शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज प्रवेश करणार

एमपीसी न्यूज: आंबेडकरी विचारांच्या नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या सुषमा अंधारे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी बारा वाजता त्या मातोश्री येथे शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत. सुषमा अंधारे या आंबेडकरी विचारांची धडधडती तोफ म्हणून ओळखल्या जातात. (Suhma Andhare) मागील काही काळापासून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होत्या. मात्र आज त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

 

सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये ही सर्व माहिती दिली होती. ठाकरे कुटुंबीयांचा साधेपणा त्यांना भावला होता आणि त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. खरंतर याआधी सुषमा अंधारे या शिवसेनेच्या कट्टर विरोधक होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून यापूर्वी अनेकदा शिवसेनेवर टीका केली आहे. परंतु सद्यस्थितीत शिवसेनेतील अनेक नेते सोडून जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी नेतृत्वाला साथ द्यायला हवी या विचाराने मी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

 

सुषमा अंधारे यांनी अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. 2019 च्या विधानसभा निवडणुका वेळी त्यांनी आपल्या भाषणांनी प्रचार सभा ही गाजवल्या. पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना आपल्याला विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळेल असं त्यांना वाटलं होतं. परंतु त्यांच्या ऐवजी अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेवर पाठवलं. तेव्हापासून त्या काहीशा नाराज असल्याची चर्चा होती. (Sushma Andhare) मात्र आज अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केला आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्या शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.