Pavana Dam: पावसाची विश्रांती!  पवना धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा

एमपीसी न्यूज : मागील पाच दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरातही पावसाचा जोर कमी झाला आहे. (Pavana Dam)त्यामुळे धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात 83.99 टक्के पाणीसाठा होता. यंदा आजमितीला 81.23 टक्के पाणीसाठा आहे. 

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. यंदा उष्णतेची लाट, पाण्याचा वापर वाढल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले होते. त्यातच यंदा पावसानेही मोठी ओढ दिली होती.

 

MPC News Podcast 28 July 2022-ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

 

जून महिन्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे महापालिकेने दैनंदिन पाणीवापर अत्यंत काटकसरीने करावा. दैनंदिन पाणीवापर असाच सुरु राहिल्यास आणि पाऊस लांबणीवर गेल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महापालिकेनेही आणखी पाणी कपात करण्याचे नियोजन सुरू केले होते. परंतु, 1 जुलै पासून दमदार पावसाला सुरुवात झाली. झपाट्याने धरणातील पाणीसाठा वाढला. (Pavana Dam) त्यामुळे वाढीव पाणीकपात टळली. परंतु, मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे.

 

त्यामुळे धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात 83.99 टक्के पाणीसाठा होता. यंदा आजमितीला 81.23 टक्के पाणीसाठा आहे.

 

 

पवना धरणातील परिस्थिती!

गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 1 मि.मि.

1 जूनपासून झालेला पाऊस = 1, 581 मि.मि.

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 1,700 मि.मि.

धरणातील सध्याचा पाणीसाठा = 81.23 टक्के”

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 83.99 टक्के

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 0 टक्के

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.