Pune accident: सिंहगड रस्त्यावर भीषण अपघात, मद्यधुंद कारचालकाने दोघांना उडवले

एमपीसी न्यूज: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या इसमाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. (Pune accident) यामध्ये दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी सर्कल जवळ बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात योगेश पवार आणि विपिल हळदकर असे दोघेजण जखमी झाले आहेत. 
हवेली पोलिसांनी याप्रकरणी कारचालक अमेन्द्र सिंग याला ताब्यात घेतले आहे. तो दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत होता. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय होते. नांदेड सिटी जवळ येताच त्याचे कार वरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून चालणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अमेन्द्र सिंग याला ताब्यात घेतले. (Pune accident) वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.