Pimpri News : पिंपरी-चिंचवड मराठी नाट्य परिषदेच्या रौप्य महोत्सवानिमित्त शनिवारी, रविवारी नाट्य महोत्सव – भाऊसाहेब भोईर

एमपीसी न्यूज – लोकनेते शरद पवार साहेब यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे उद्‌घाटन 8 ऑगस्ट 1996 ला करण्यात आले होते. या संस्थेचे हे रौप्यमहोत्सवी 25 वे वर्ष आहे. तसेच लोकनेते पवार साहेब यांचा 81 वा वाढदिवस आहे. त्याचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दोन दिवसांचा नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तसेच यावेळी नाट्य परिषदेशी विविध मार्गाने जोडल्या गेलेल्या व अनेक वर्षे कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्तींचा उचित सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी येथे गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) यावेळी गौरी लोंढे, रुपाली पाथरे, किरण येवलेकर, सुहास जोशी, संतोष शिंदे, सुदाम परब, राहुल भोईर, ललित थोरात आदी उपस्थित होते. भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, या संस्थेने गेल्या पंचवीस वर्षांत सातत्याने विविध कार्यक्रमांव्दारे पिंपरी चिंचवड परिसरातील प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम केले आहे.

संस्था स्थापनेपासून सुरू केलेले कार्यक्रम नंतर आशा भोसले पुरस्कार, बालनाट्य शिबिरे, बालनाट्य स्पर्धा, राज्यस्तरीय राम गणेश गडकरी करंडक एकांकिका स्पर्धा, नामांकित कवींचा सन्मान, वर्धापन दिनी ज्येष्ठ आणि उभरत्या रंगकर्मींचा गौरव असे विविध कार्यक्रम वर्षभर असतात. दोन वर्षांपूर्वी पुरग्रस्तांना मदतीसारखे सामाजिक कार्य ही संस्थेने केलेले आहे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

शनिवारी दि.18 व रविवारी दि.19 डिसेंबर ला हा नाट्य महोत्सव चिंचवड गावातील प्रा. रामकृष्ण प्रेक्षागृह येथे होणार आहे. शनिवारी रात्री 8:30 वाजता ज्येष्ठ कलाकार भरत जाधव यांची ‘मोरुची मावशी‘ आणि रविवारी ‘तु म्हणशील तसं !’ हे नाटक होणार आहे.

यावेळी मित्र मंडळ, चिंचवड, वसंतराव देशपांडे मेमो. फौंडेशन, वसंतराव जोशी संस्था (मदन जोशी), कलारंग (अमित गोरखे), नादब्रह्म (घांगुर्डे), अथर्व नाट्य (डॉ. संजीवकुमार), टेल्को कलासागर, नृत्य संस्था (नंदकिशोर कपोते), कर्तव्य फाऊंडेशन (सचिन पटवर्धन), नाट्य सिंधू, कलापिनी, समाधान गुडदे संस्था, थिएटर वर्कशॉप कंपनी, विकासनगर संगीत विद्यालय शिधये संस्था, गुरुकृपा संगीत क्लास (पंडित पंढरीनाथ दरेकर), आकांक्षा इवेंट ऑर्गनायझेशन (तृप्ती धनवटे), आमचे आम्ही संस्था (मनोज डाळींबकर), प्रयोग थिअटर्स संस्था (योगेश दळवी), स्वरसादना संगीत विद्यालय, जटायू कल्चलर अकॅडमी (नितीन सुतार), नृत्य शारदा कला मंदिर (स्नेहल सोमण), कोकरे (मंडप), गवळी (मंडप), रेझोनन्स स्टुडीओ (तेजस चव्हाण), सिनेरियो प्रोडक्शन्स (सूचित गवई) या संस्थांचा आणि सुधाकर चव्हाण (सांगवी), विजय जोशी, उमा खापरे, वैशाली मराठे, राजाभाऊ गोलांडे, धोंडीबा सायकर, मधू जोशी, मंजुश्री दिवाण, पुरुषोत्तम यांचा गौरव करण्यात येणार आहे.

तसेच सदाफुले, उद्धव कानडे, स्वाती पाटील, नंदकिशोर तोष्णीवाल, शंतनु गटणे, शंकर मराठे (फोटोग्राफर ), सुभाष चव्हाण (फोटोग्राफर), पाचंगे परिवार, विवेक क्षीरसागर, तेजश्री अडीगे, वैशाली पळसुले, शरद भगत (मेकअप), माऊली काळे (बॅकस्टेज), अतुल पंढरपुरे (साउंड), अनूप कोठावळे (लाइट), फिरोज मुजावर, मनोज कांबळे (साऊंड), मा. आशाताई देशमुख, मा. मीनाक्षीताई आठवले, संगीता लाखे (लावणी), वैशाली मराठे, राम माळी (दिग्दर्शक), आसाराम कसबे या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते उचीत गौरव करण्यात येणार आहे तसेच नाट्यपरिषद कार्यकारिणी विशेष निमंत्रित नाट्य परिषद शाखा शिरूर, तळेगाव, बारामती, पुणे, कोथरूड, दौंड सर्व सन्मानीय पत्रकार बंधु भगिनी यांचाही गौरव करण्यात येणार आहे अशीही माहिती भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.