Chikhali Crime News : दुचाकीस्वार महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पतीसोबत दुचाकीवरून जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 15) सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास मोशी-चिखली रोडवर चिखली येथे घडली.

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी फिर्यादी त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून जात होत्या. फिर्यादी दुचाकी चालवत होत्या. मोशी-चिखली रोडवर जे के फर्निचर दुकानासमोर आल्यानंतर एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची चेन आणि 15 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.