Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड मधील 6 ट्रायथलिट यांनी कजाकिस्तान मध्ये रोवला मानाचा तुरा, आयर्न मॅन किताब पटकावला

एमपीसी न्यूज:  14 ऑगस्ट 2022 रोजी कजाकिस्तान देशाची राजधानी शहर नूर सुलतान येथे पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेमध्ये ट्राय फिट झोन पिंपरी चिंचवड या ग्रुपमधील (Pimpri-Chinchwad) १)राम गोमारे २)वैभव ठोंबरे ३)सचिन वाकडकर ४)अमित लोंढे ५)रोहित क्षीरसागर ६)पांडुरंग बोडके यांनी आयर्न मॅन हा मानाचा किताब पटकावला आहे. हा किताब मिळवल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या ‍शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

इशिम नदीच्या थंडगार पाण्यात 3.8 किमी पोहणे, हेड विंड क्रॉस विंड मध्ये 180 किमी सायकल चालवणे आणि दिवसा गरम व रात्री थंड वातावरणात 42 किमी धावणे हा अतिशय खडतर प्रवास पूर्ण करणे जिकीरीचे काम होते, ते काम या तिघांनी अतिशय जिद्दीने पूर्ण केले आहे.(Pimpri-Chinchwad) या स्पर्धेसाठी हे 6 ट्रायथलिट गेल्या 2 वर्षापासून अथक परिश्रम घेत आहेत, या ग्रुप मधील वैभव ठोंबरे हे उत्तम स्विमर असून त्यांनी बाकी 5 जणांना अतिशय उत्तमरीत्या पोहण्याचे धडे दिले, तसेच सायकलिंग व रनिंग मधील बारकावे शोधून उत्तम असे मार्गदर्शन केले आहे.

या स्पर्धेच्या प्रवासात स्वतःची लढाई स्वताच्या संयमाशी असते, सतत 16-17 तास न थांबता हा प्रवास करताना शरीर कोणत्या वेळी वेगळे वळण घेईल हे सांगता येत नाही,(Pimpri-Chinchwad) रेसच्या दिवशी बॉडी थकली तरी चालेल पण मन थकले नाही पाहिजे अशी भावना सर्व ट्रायथलिट यांनी व्यक्त केली, या ट्रायथलिट चे पिंपरी चिंचवड व पुणे शहरातून अभिनंदन होत आहे.

Today’s Horoscope 18 August 2022-जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Ironman स्पर्धा म्हणजे नक्की काय असते ?
3.8 Km swimming (वेळ मर्यादा 2 तास 20 मिन ) नंतर 180 km cycling (वेळ मर्यादा 8 तास 10 मिन) आणि मग 42.2 km चे running ( 6 तास 30 मिन ) असे एका पाठोपाठ तीन प्रकार (Triathlon) एकूण 17 तासांच्या cut off time च्या आत पूर्ण करायचे असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.