Pimpri: शहरात ख्रिसमस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज –  ख्रिस्ती बांधवांचा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक ख्रिसमस अर्थात नाताळचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. विश्‍व शांतीचा संदेश देणारा येशू ख्रिस्ताचा जन्म शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिश्‍चन बांधवांनी उत्साहात भेटवस्तू व शुभेच्छा देत साजरा केला. ख्रिस्ती बांधव कुटुंबीयांसह या सोहळ्यात सहभागी झाले होते.

ख्रिश्‍चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदोल्हासाचा सण अर्थात नाताळ. ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे, ख्राईस्ट मास. येशूच्या (ख्रिस्त) जन्मदिनानिमित्त विशेष प्रार्थना करण्यात येते. शहरातील सर्वच चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. एकमेकांना शुभेच्छा देत ख्रिसमस साजरा करण्यात आला.

पिंपरीतील दापोडी होलिक्रॉस, विनियार्ड, आकुर्डीतील सेंट जोसेफ, पिंपळे गुरवमधील सेंट थॉमस कॅथलिक चर्च येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बायबलचे वाचन तसेच दानधर्म करण्यात आला. चिंचवडसह काळेवाडी, फुगेवाडी व भोसरी भागांत ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.