Pimpri : शहरातील राष्ट्रीय खेळाडू यश चिनावलेचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने” सन्मान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रीय स्केटींग खेळाडू यश विनय चिनावले  याला (Pimpri) राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते 2021-22 चा “शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल बालेवाडीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे,  पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांची आदी मान्यवर उपस्थित होते.

Fugewadi : फुगेवाडी स्मशानभूमीजवळ रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बांधा – अमित गोरखे

यश चिनावले हा 2008 पासून स्केटींग खेळाचा सराव करीत असून निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेतून यशने खेळाची सुरुवात केली. त्याला वेळोवेळी शैलेंदा डुबरे, राहुल राणे आणि अशोक गुंजाळ या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र राज्यासाठी त्याने आतापर्यंत राज्यस्तरावर 11 सुवर्ण, 2 कास्य आणि राष्ट्रीयस्तरावर 2 रौप्य, 4 कास्य पदक पदकावली आहेत.

स्केटींग खेळातील उत्कृष्ठ कामगीरीमुळे त्याला 2021-22 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने “सर्वोत्कृष्ट खेळाडू” म्हणून गौरविण्यात आले आहे. या यशाबददल महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी यशचे अभिनंदन केले. तसेच पुढील (Pimpri) वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.