Phugewadi : फुगेवाडी स्मशानभूमीजवळ रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बांधा – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – दापोडी रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या फुगेवाडी (Phugewadi) गावठाणातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागते. येथून नागरिक जीव धोक्यात घालून ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी येथे भुयारी मार्ग बांधण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

Talegaon : जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना या संदर्भात अमित गोरखे यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील दापोडी, फुगेवाडी ही महत्त्वाची गावे आहेत. पवना नदी, रेल्वे मार्ग आणि जुना पुणे-नाशिक महामार्गामुळे अनेक अडचणींना येथील नागरिकांना सामोरे जावे लागते. फुगेवाडी येथील पवना नदी घाटावरील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. हा रस्ता लोहमार्गावरून धोकादायक पध्दतीने ओंलाडावा लागतो.

स्मशानभूमीकडे रुग्णवाहिका देखील या ठिकाणाहून जातात. नागरिक, लहान मुले धोकादायकपणे लोहमार्ग ओंलाडत असल्यामुळे देखील अपघाताचा धोका निर्माण होतो. पिंपरी चिंचवड शहरात मध्यवर्ती ठिकाणी या प्रकारे धोकादायक पध्दतीने नागरिकांना लोहमार्ग ओंलाडावा लागतो. हे चिंताजनक आहे. याचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाने फुगेवाडी स्मशानभीकडे जाण्यासाठी लोहमार्ग ओोंलाडण्यासाठी भुयारी मार्ग किंवा सब-वे तयार करावा.

जेणे करून परिसरातील नागरिकांचा हा धोकादायक प्रवास थांबण्यास मदत होईल. या कामासाठी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाचे सहकार्य लागणार आहे. त्यासंबधित परवानगी आणि सर्व बाबींची पुर्तता करणेत यावी. तसेच त्यासाठी आवश्यक तरतूद आणि कार्यवाही करावी, असे अमित गोरखे यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.