Pimpri : मोबाईल आणि टीव्हीच्या दुनियेतून बाहेर पडून मुलांनी मैदानी खेळामध्ये उतरावे – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – मोबाईल आणि टीव्हीच्या दुनियेतून बाहेर (Pimpri) पडून मुलांनी मैदानी खेळामध्ये उतरावे असे आवाहन पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले.

” नमो चषक 2024 पिंपरी-चिंचवड शहर…” आमदार उमा खापरे व निवडणूक प्रमुख पिंपरी विधानसभा अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये नमो चषक 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकुण 10 प्रकारच्या खेळांचे राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय, स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहे. गोरखे यांच्या माध्यमातून जिल्हास्तरिय हँडबॉल व बास्केटबॉल या दोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्धाटन विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार खापरे यांनी स्पर्धकांना संबोधित केले. भारतातील तरुण /तरुणी युवकांनी स्पर्धेच्या माध्यमातून आपले देशाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे. शहरात ही आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय खेळाडू घडत आहे. या खेळाडूंना त्यांच्या आवडीचे खेळ खेळता यावे यासाठी या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहे. आज संपुर्ण देशाता नमो चषक 2024 आयोजीत केले जात आहे. तसेच आपल्या शहरात ही त्याचे आयोजन करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे म्हणून सर्व शहरातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहाभागी व्हावे असे आवाहन केले.

Pune : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा महत्त्वपूर्ण; अजित पवार करणार मार्गदर्शन

गोरखे यांनी देखील स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले, ते म्हणाले, आजचा (Pimpri) तरुण हा मोबाइल तसेच टिव्ही च्या दुनियेत गुंतत चाललेल आहे. युवक हा ऑनलाइन गेम मधे अडकून मैदानी खेळा पासून दूर होत चालला आहे. याचा फार वाईट परिणाम तरुण पिढीवर होत म्हणून युवकांनी मोबाइल व टिव्हीच्या दुनियेतून बाहेर पडून मैदानी खेळात नाविन्यपूर्ण नाव लौकिक कमवावे तसेच मैदानी खेळात सहभागी व्हावे. जिल्ह्यातून स्पर्धक या नमो चषक 2024 साठी आलेले आहे. या खेळात हँडबॉल व बास्केटबॉल साठी एकुण 60 संघांनी सहभाग घेतला आहे.

या स्पर्धेला उपस्थितांमधे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, उपाध्यक्ष राजु दुर्गे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, माजी नगरसेविका अनुराधात गोरखे, केशव घोळवे, क्रिडा प्रकोष्ठ अध्यक्ष जयदीप खापरे, भाजपा पदाधिकारी मनिषा शिंदे,तसेच सर्व भाजपा पदाधिकारी या उद्धाटनाला उपस्थीत होते. तसेच या स्पर्धेला अश्वमेघ स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.